अ‍ॅपबंदीनंतर मोदी सरकारचा चीनला अजून एक दणका

केंद्र सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर आणखी एका क्षेत्रातील रस्ते बंद केले आहेत. चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी भारत परवानगी देणार नाही. याशिवाय भागीदारीच्या माध्यमातूनही कोणत्याच चिनी कंपनीला देशातील रस्ते बांधणी क्षेत्राशी संबंधित कामं दिली जाणार नाही, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

Leave a Reply